Site icon stockmarketlearnmarathi

डीमैट अकाउंट म्हणजे काय?

आज या लेख मधून आपण समजुन घेणार आहोत कि, डीमैट अकाउंट म्हणजे काय? जर तुम्ही शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्या कंपनीचे  शेयर्स घेऊन तुम्ही त्या कंपनीचे शेयरहोल्डर बनू शकता. आणि तुम्हाला जे शेयर्स मिळाले आहेत, ते शेयर्स तुम्हाला पूर्वी पेपर प्रिंट मध्ये मिळायचे. आणि ते  शेयर्स चोरीला जाण्याचा किंवा हरवण्याचा धोका असायचा. म्हणून भारत सरकारने 1996 मध्ये डीमैट अकाउंट आणले आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार त्यांचे शेयर्स इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेवू शकतात.

डीमैट अकाउंट म्हणजे काय?

शेयर बाजरातून खरेदी केलेले शेयर्स, बांड्स, आणि इतर सिक्योरिटीज डिजिटल स्वरुपात ठेवण्यासाठी डीमैट अकाउंट चा वापर केला जातो. तुम्ही खरेदी केलेले सर्व शेयर्स तुम्ही डीमैट अकाउंट मध्ये सुरक्षित ठेवू शकता. आणि शेयर मार्किट मध्ये व्यापार करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा सहज वापर करू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर डीमैट अकाउंट हा तुमचा बैंक अकाउंट चा एक प्रकार आहे. ज्या खात्यात तुमचे शेयर्स डिजिटल स्वरुपात किंवा डीमैट स्वरुपात ठेवले जातात.

तुम्हाला माहिती आहे, कि SEBI ला शेयर मार्किट रेगुलेट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे डीमैट अकाउंट ची सुरक्षितेची खात्री करण्यासाठी NSDL आणि CDSL या भारतातील दोन डिपाजिटरी ना सर्व खात्यामधील डिपॉजित शेयर आणि क्रेडिट-डेबिटवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

डिपाजिटरी पार्टिसिपंट ज्याला आपण स्टॉक ब्रोकर म्हणतो, हा स्टॉक ब्रोकर गुंतवणूकदार आणि स्टॉक एक्सचेंजर यांना जोडण्याच काम करतो. हा स्टॉक ब्रोकर तुम्हाला डीमैट अकाउंट उघडण्यास मदत करतो. आणि तुम्हाला एक ट्रेडिंग ऍप देखील देतो, त्या ऍप ने तुम्ही शेयर मार्किट मध्ये कोणत्याही शेयर मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू शकता.

डीमैट अकाउंट कसे उघडायचे?

शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमैट अकाउंट उघडने अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी तुम्हाला चांगला स्टॉक ब्रोकर निवडावा लागतो. सर्व स्टॉक ब्रोकर्स तुम्हाला ऑनलाइन डीमैट अकाउंट उघडण्याची सुविधा देतात. यासाठी तुम्हाला काही डॉक्यूमेंट ची गरज लागणार आहे.

डीमैट अकाउंट चे कोणते फायदे आहेत?

डीमैट अकाउंट चे  तोटे कोणते आहेत?

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

निष्कर्ष 

आपणास सर्व नियमित वाचकांना ह्या लेख मध्ये डीमैट अकाउंट काय आहे? यांच्या बद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. आणि डीमैट अकाउंट च्या सबंधित इतर माहिती सुद्धा तुम्हाला देण्यात आली आहे. जर तुम्हाला हा लेख खुप आवडला असेल तर, तुम्ही ह्या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.

FAQ 

डीमैट अकाउंट म्हणजे काय?

शेयर बाजरातून खरेदी केलेले शेयर्स, बांड्स आणि इतर सिक्योरिटीज डिजिटल स्वरुपात ठेवण्यासाठी डीमैट अकाउंट चा वापर केला जातो. तुम्ही खरेदी केलेले सर्व शेयर्स तुम्ही तुमच्या डीमैट खात्यात सुरक्षितपणे ठेवू शकता.

डीमैट अकाउंट उघडण्यासाठी कोणत्या डॉक्यूमेंट ची आवश्यकता आहे?

डीमैट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बैंक पासबुक, कैंसल चेक, बैंक अकाउंट स्टेटमेंट, पैन कार्ड आणि पासबुक साइज फोटो ची आवश्यकता आहे.

डीमैट अकाउंट चे फायदे कोणते आहे?

तुम्ही तुमचे शेयर्स आणि इतर सिक्योरिटीज डीमैट अकाउंट मध्ये सुरक्षित ठेवू शकता आणि डीमैट अकाउंट मध्ये ट्रेड सेटलमेंट फक्त एका दिवसात पूर्ण होते.

 

Exit mobile version