जीओ कॉइन हे एक प्रकारचे डिजिटल टोकन आहे, जे ब्लॉकचैन आणि वेब 3 या टेक्नोलॉजी वर आधारित आहे.
पण जिओ कॉइन हे बिटकॉइन सारखी Cryptocurrency नाही.
तुम्ही क्रिप्टो एक्सचेंज मधून जिओ कॉइन विकत घेऊ शकत नाही. तुम्ही Jio Sphere ब्राउज़र चा वापर करुन जिओ कॉइन मिळवू शकता.
जिओ कॉइन मिळवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोर वरुन Jio Sphere ब्राउज़र चा एप डाउनलोड करा.
साइन अप केल्यानंतर, प्रोफाइल आइकॉन वर क्लिक करा. प्रोफाइल आइकॉन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Jio Coin वॉलेट दिसेल.
तुम्ही Jio Sphere ब्राउज़र किती वापरता यावर आधारित, तुम्हाला जिओ कॉइन रिवॉर्ड म्हणून मिळतील.
Jio Sphere ब्राउज़र वापरून, तुम्हाला जिओ कॉइन रीवार्ड म्हणून मिळतील.
तुम्ही जिओ मोबाइल रिचार्ज, रिलायंस पेट्रोल पंप, आणि इतर ठिकाणी डिस्काउंट ऑफर साठी, जिओ कॉइन चा वापर करू शकता.