जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेयर्स जारी करते तेव्हा त्या कंपनीला IPO घेऊन शेयर बाजारात यावे लागते.
ती कंपनी आईपीओ च्या माध्यमातून कंपनीसाठी निधी उभारते, जेणेकरून भविष्यात कंपनीचा व्यवसाय वाढू शकेल.
कंपनीने आईपीओ आणण्याआधी कंपनीचे शरहोल्डर्स खुप कमी असतात, पण आईपीओ आल्यानंतर कंपनी आपले शेयर्स लोकांपर्यंत आणते.
तुम्हाला शेयर मार्केट मधील कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करायची असेल, तर त्या कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस केले पाहिजे
त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्या कंपनीची फाइनेंसियल कंडीशन जाणून घेतली पाहिजे.
फिक्स प्राइस आईपीओ ला इश्यू प्राइस पण म्हणतात. शेयर मार्किट मध्ये कोणतीही कंपनी आपल्या शेयर ची प्राइमरी सेल्लिंग साठी फिक्स प्राइस ऑफरिंग निश्चित करते.
बुक बिल्डिंग आईपीओ मध्ये, IPO सुरु करणारी कंपनी गुंतवणूकदाराला 20 टक्के मूल्य बैंड देते.
1. तुम्हाला कमी प्राइस मध्ये शेयर्स खरेदी करण्याची संधी मिळते. 2. तुम्हाला गुंतवणुकीची खुप चांगली संधी मिळते.