शेयर बाजार म्हणजे काय ?

शेयर बाजार हे ठिकाण आहे जिथे तुम्ही शेयर खरेदी आणि विक्री करू शकता.

शेयर बजारचे प्रकार

भारतात दोन मुख्य प्रकारचे बाजार आहेत, प्राइमरी मार्किट आणि सेकेंडरी मार्किट. 

प्राइमरी मार्किट

प्राइमरी मार्किट हे असे मार्किट आहे जिथे कंपनी पैसे मिळवण्यासाठी प्रथम नोंदणी करते.  

सेकेंडरी मार्किट

जेव्हा एखादी कंपनी आपले नविन शेयर्स प्राथमिक बाजारात विकते तेव्हा ते शेयर्स दुय्यम बाजारातील गुंतवणूकदार किंवा व्यापारी खरेदी आणि विकू शकतात. 

शेयर बाजार कसा चालतो?

 भारतातील शेयर बाजार SEBI (सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडिया) मार्फत चालतो. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला दलाल स्ट्रीट असेही म्हणतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1875 मध्ये झाली. 

नेशनल स्टॉक एक्सचेंज 

नेशनल स्टॉक एक्सचेंज हे भारताचे विश्वसनीय स्टॉक एक्सचेंज आहेत. नेशनल स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1992 मध्ये झाली.  

शेयर्स कसे खरेदी करायचे?

शेयर बाजार मध्ये शेयर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असते. 

1. बैंक खाते 

शेयर बाजार मध्ये काम करण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. 

2. डीमैट खाते 

 तुम्ही खरेदी केलेले शेयर्स डीमैट खात्यात जमा होतात.