आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत की, IPO म्हणजे काय? तुम्ही जर नविन गुंतवणूकदार असाल तर, शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक कशी करावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, कि तुम्ही आईपीओ च्या माध्यमातून शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक करू शकता.
IPO म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेयर्स जारी करते तेव्हा त्या कंपनीला IPO घेऊन शेयर बाजारात यावे लागते. ती कंपनी आईपीओ च्या माध्यमातून कंपनीसाठी निधी उभारते, जेणेकरून भविष्यात कंपनीचा व्यवसाय वाढू शकेल. कंपनीने आईपीओ आणण्याआधी कंपनीचे शरहोल्डर्स खुप कमी असतात, पण आईपीओ आल्यानंतर कंपनी आपले शेयर्स लोकांपर्यंत आणते. तुम्हाला शेयर मार्केट मधील कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करायची असेल, तर त्या कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस केले पाहिजे. त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्या कंपनीची फाइनेंसियल कंडीशन जाणून घेतली पाहिजे. एक वेळा कंपनीने शेयर मार्किट मध्ये आईपीओ आणल्यानंतर, त्या कंपनीचे स्टॉक, एक्सचेंज मध्ये लिस्टेड केले जातात. आणि त्यानंतर, एक्सचेंज मध्ये लिस्टेड असलेल्या कंपनीच्या शेयर्स ची खरेदी-विक्री ट्रेडर करतात.
IPO चे प्रकार
फिक्स प्राइस ऑफरिंग
फिक्स प्राइस आईपीओ ला इश्यू प्राइस पण म्हणतात. शेयर मार्किट मध्ये कोणतीही कंपनी आपल्या शेयर ची प्राइमरी सेल्लिंग साठी फिक्स प्राइस ऑफरिंग निश्चित करते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना शेयर ची प्राइस माहिती होते. आणि कंपनी त्या शेयर्स ला लोकांसाठी खुले करतात. फिक्स प्राइस आईपीओ मध्ये, आईपीओ इश्यू बंद झाल्यानंतर, तुम्हाला शेयर मार्किट मध्ये या आईपीओ ची मागणी काय आहे याची माहिती मिळते. जर तुम्ही हा आईपीओ खरेदी केला तर तुम्हाला कंपनीने फिक्स केलेली प्राइस मोजावी लागते.
बुक बिल्डिंग ऑफरिंग
बुक बिल्डिंग आईपीओ मध्ये, IPO सुरु करणारी कंपनी गुंतवणूकदाराला 20 टक्के मूल्य बैंड देते. या बुक बिल्डिंग ऑफर मध्ये, इच्छुक गुंतवणूकदार शेयर्स ची फाइनल प्राइस ठरण्यापूर्वी शेयर्स वर बोली लावतात. ज्या स्टॉक ची प्राइस सर्वात कमी आहे त्याला फ्लोर प्राइस म्हणतात. आणि ज्या शेयर्स ची प्राइस सर्वात जास्त आहे त्याला कैप प्राइस म्हणतात. कंपनीच्या शेयर्स ची फाइनल प्राइस गुंतवणूकदारांच्या बोलीद्वारे ठरवली जाते.
आईपीओ चे फायदे काय आहेत?
- तुम्हाला कमी प्राइस मध्ये शेयर्स खरेदी करण्याची संधी मिळते.
- तुम्हाला गुंतवणुकीची खुप चांगली संधी मिळते.
डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
निष्कर्ष
तुम्हाला सर्व नियमित वाचकांना, ह्या लेख मध्ये IPO काय आहे? याबद्दल सविस्तर सांगितले आहे. आणि आईपीओ बद्दल इतर सुद्धा माहिती दिली आहे. जेणेकरून तुम्हाला भविष्यात आईपीओ बाबत योग्य फायदे मिळू शकतील. आम्हाला आशा आहे, कि तुम्हाला ही माहिती खुप आवडली असेल, तर तुम्ही ह्या लेख ला लाइक, शेयर, आणि कमेंट कराल.
हे पण वाचा: वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.
FAQ
IPO म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेयर्स खुले करते, तेव्हा त्या कंपनीला शेयर बाजारात IPO आणावा लागतो. ती कंपनी आईपीओ च्या माध्यमातून कंपनी साठी निधी उभारते, जेणेकरून भविष्यात कंपनीचा व्यवसाय वाढू शकेल.
IPO चे किती प्रकार आहे?
IPO चे दोन मुख्य प्रकार आहेत, फिक्स प्राइस ऑफर आणि बिल्डिंग प्राइस ऑफर.
IPO चे फायदे काय आहेत?
आईपीओ मुळे, तुम्हाला कमी प्राइस मध्ये शेयर्स खरेदी करण्याची संधी मिळते आणि IPO मध्ये गुंतवणूक करण्याची खुप चांगली संधी मिळते.