चीन ने DeepSeek-R1 चे AI मॉडल लॉन्च केले, आणि जगात खळबळ उडवून दिली.

चीन चा AI मॉडल DeepSeek-R1 मुळे जगात खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिकन शेयर बाजाराला जवळपास एक अब्ज डॉलर चे नुकसान झाले आहे. आता आपण DeepSeek-R1 म्हणजे काय? याबद्द्ल सविस्तर समजून घेऊया.

 DeepSeek

DeepSeek-R1 म्हणजे काय?

DeepSeek-R1 हे चीन चे ओपन सोर्स लार्ज लैंग्वेज AI मॉडेल आहे. DeepSeek-R1 चीन मधील एका लहान स्टार्ट-अप कंपनीने विकसित केले आहे. या स्टार्ट-अप कंपनीचे हेड क्वार्टर चीन मधील हांगझोऊ शहरात आहे. DeepSeek-R1 एप ब्रिटन, अमेरिका आणि चीन मध्ये एप्पल प्ले स्टोर वरुन सर्वाधिक डाउनलोड केलेले एप बनले आहे. आणि ओपन AI चे चाट जीपीटी ला मागे टाकत सर्वात जास्त रेटिंग चे फ्री एप बनले आहे.

DeepSeek-R1 ची निर्मित्ती कोणी केली आहे?

DeepSeek-R1 ची निर्मिती चीन मधील 40 वर्षाचा इंटेलीजेंट तरुण लियांग वेनफेंग नी केली आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते बनवायला फक्त दोन महिन्यांच्या वेळ लागला. लियांग वेनफेंग नी झेजियांग यूनिवर्सिटी मधून इनफार्मेशन अण्ड इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग मध्ये ग्रेजुएट आणि पोस्ट ग्रेजुएट ची डिग्री प्राप्त केली आहे.

DeepSeek-R1 चा निर्मिती साठी किती पैसे लागले?

DeepSeek-R1 ची सर्वात चांगली गोष्ट ही आहे, कि हे लेस्टेस्ट AI मॉडेल ची निर्मिती करण्यासाठी फक्त 60 लाख रूपये खर्च झाले आहे. आणि दुसरीकडे जिथे ओपन AI च्या चाट जीपीटी, गूगल आणि माइक्रोसॉफ्ट चे AI मॉडेल तयार करण्यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च केले गेले आहेत. आणि DeepSeek-R1 चे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते कमी प्राइस मध्ये खरेदी केले जाऊ शकते. DeepSeek-R1 प्रति दशलक्ष इनपुट टोकन साठी $0.55 शुल्क आकारते. आणि प्रति दशलक्ष आउटपुट टोकन साठी $2.19 शुल्क आकारले जाते. हे ओपन AI च्या चाट जीपीटी पेक्षा खूपच स्वस्त आहे. आणि ओपन AI 01 प्रति दशलक्ष इनपुट टोकन साठी $15 आकारते. आणि प्रति दशलक्ष आउटपुट टोकन साठी $60 शुल्क आकारले जाते.

DeepSeek-R1 मुळे शेयर बाजारात नुकसान झाले?

DeepSeek-R1 आल्यामुळे त्याचा प्रसिद्धि मध्ये खुप वाढ झाली आहे. आणि त्यामुळे जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ति 108 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 9.3 लाख करोड रुपयांचे स्टॉक मार्किट मध्ये बुडाले आहेत. आणि DeepSeek-R1 मुळे अमेजॉन, एप्पल, मेटा, माइक्रोसॉफ्ट, एनवीडिया आणि टेस्ला सारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांना स्टॉक मार्किट मध्ये प्रचंड प्रमाणात लॉस झाला आहे. आणि सर्वात जास्त लॉस आर्टिफीसियल इंटेलिजेंस आणि टेक कंपन्यांचे झाले आहेत.

DeepSeek-R1 चा उपयोग कसा करायचा?

DeepSeek-R1 चा उपयोग करण्यासाठी, सर्वात प्रथम www.deepseek.com या वेबसाइट वर जा. त्यानंतर start now यावर क्लिक करा आणि साइन अप करा. sign up करण्यासाठी वैलिड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी वर एक कोड येईल, तो कोड टाइप करा आणि साइन अप करा. आता तुम्ही DeepSeek-R1 चा वापर करू शकता.

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

निष्कर्ष

आपण सर्व नियमित वाचकांना या लेखात DeepSeek-R1 बद्दल सविस्तर सांगितले आहे. आणि DeepSeek-R1 बद्दल इतर माहिती सुध्दा देण्यात आली आहे. जर तुम्हाला या लेखात दिलेली माहिती आवडली असेल, तर तुम्ही या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: Jio Sphere ब्राउज़र चा वापर करुन रिवॉर्ड म्हणून मिळवा जिओ कॉइन.

Leave a Comment