देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायंस इंडस्ट्रीज ची शाखा रिलायंस जिओ इन्फोकॉम चा आईपीओ आणण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे.
रिलायंस जिओ इन्फोकॉमचा आईपीओ चा आकार जवळपास 35 हजार कोटी ते 40 हजार कोटी चा असू शकतो.
हा आईपीओ या वर्षाचा दुसऱ्या साहामाही मध्ये आणण्याचे रिलायंस इंडस्ट्रीज चे टार्गेट आहे.
कंपनी ने प्री-आईपीओ प्लेसमेंट साठी गुंतवणूकदाराशी चर्चा सुरु केलेली आहे.
स्टॉक एक्सपर्ट चे असे म्हणणे आहे, कि हा आईपीओ आकाराने सर्वात मोठा असू शकतो.
पण या आईपीओ ला गुंतवणूकदाराची डिमांड जास्त असू शकतात.
या आईपीओ मध्ये ऑफर फॉर सेल (OFS), फ्रेश इश्यू, आणि प्री-आईपीओ प्लेसमेंट यांचा समावेश असेल.
रिलायंस जिओ इन्फोकॉम कंपनीचे वैल्यूएशन जवळपास 100 बिलियन डॉलर ते 120 बिलियन डॉलर असू शकते.
रिलायंस जिओ इन्फोकॉम कंपनी मध्ये विदेशी गुंतवणूकदाराचा जवळपास 33 टक्के हिस्सा आहे.
या कंपनीने 2020 मध्ये 18 बिलियन डॉलर चा फण्ड उभारण्यासाठी केकेआर, आणि सिल्वर लेक या सारख्या अनेक गुंतवणूकदाराला हिस्सा विकलेला आहे.