नविन गुंतवणूकदाराना शेयर मार्किट मध्ये आवड आहे, परंतु शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक कशी करावी, हे माहित नाही. त्यामुळे एखाद्या कंपनी मध्ये योग्य गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे, कि कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय?
फंडामेंटल एनालिसिस म्हणजे कोणत्याही कंपनीच्या शेयर चे इन्ट्रिंसिक वैल्यू शोधने, इन्ट्रिंसिक वैल्यू ला रिअल वैल्यू म्हणतात. तुम्ही एखाद्या कंपनीचा शेयर विकत घेतल्यास, तुम्हाला माहित आहे का, कि तुम्ही हा शेयर त्याच्या रियल वैल्यू ला विकत घेत आहेत का? किंवा तुम्ही खरेदी केलेला शेयर त्याच्या किंमतीपेक्षा महाग आहेत का? याकरिता कोणत्याही कंपनी बद्दल ही माहिती मिळविण्यासाठी फंडामेंटल एनालिसिस खुप मदत करते.
फंडामेंटल एनालिसिस चे प्रकार
फंडामेंटल एनालिसिस दोन प्रकारे केले जाते.
Qualitative Analysis
क्वालिटेटिव एनालिसिस मध्ये कंपनीच्या मैनेजमेंट चे निर्णय, कंपनीचे ब्रांड वैल्यू, कंपनीचे परफॉर्मेंस आणि इतर च्या समावेश होतो.
Quantitative Analysis
क्वांटिटेटिव एनालिसिस मध्ये, कंपनीचे फाइनेंसियल स्टेटमेंट चे नंबर तपासले जातात आणि शेयर ची रियल प्राइस चे एनालिसिस केल्या जाते.
फंडामेंटल एनालिसिस कसे करावे?
फंडामेंटल एनालिसिस करण्यासाठी, तुम्हाला कंपनीचे फाइनेंसियल स्टेटमेंट वाचावे लागेल, ते वाचल्यानंतर तुम्ही फंडामेंटल एनालिसिस करू शकता.
बैलेंस शीट
कोणत्याही कंपनी च्या बैलेंस शीट मध्ये तुम्हाला करंट एसेट, लायबिलिटी और शेयरहोल्डर इक्विटी ची माहिती मिळते. एक प्रकारे, तुम्हाला कंपनीच्या फाइनेंसियल स्टेटमेंट ची माहिती मिळते. उदाहरणार्थ, कंपनी किती पैसे कमवत आहे, किती पैसे खर्च करत आहे आणि कंपनी कडे तिच्या भविष्यातील व्यवसाय योजनेसाठी किती पैसे आहेत याची माहिती बैलेंस शीट मध्ये उपलब्ध आहे.
इनकम स्टेटमेंट
इनकम स्टेटमेंट मध्ये तुम्हाला कंपनीचा नफा आणि कंपनीचा तोट्याची माहिती मिळते.
कॅश फ्लो स्टेटमेंट
कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये, तुम्हाला कंपनी मध्ये येणारी आणि जाणारी कॅश ची माहिती मिळते.
फंडामेंटल एनालिसिस रेश्यो
फंडामेंटल एनालिसिस रेश्यो ही सर्वात सामान्य पणे वापरले जाणारे टूल्स आहेत.
ईपीएस रेश्यो
ईपीएस रेश्यो हा एक अतिशय लोकप्रिय रेश्यो आहे, तो तुम्हाला कंपनीच्या प्रत्येक शेयर वर कंपनीच्या नफ्याबद्दल सांगतो. ईपीएस रेश्यो मोजण्यासाठी खाली दिलेले सूत्र खालीलप्रमाणे आहे. तुम्ही हे सूत्र वापरून ईपीएस रेश्यो सहज काढू शकता.
EPS RATIO = (Net Income-Preferred Share Dividend) / Total No. of Share.
पी बी रेश्यो
ज्याप्रमाणे तुम्हाला बैलेंस शीट मधून एखाद्या कंपनीच्या बुक वैल्यू ची माहिती मिळते, त्याचप्रमाणे या बुक वैल्यू च्या आधारे कंपनीच्या शेयर ची किंमत काय आहे याची तुलना करुन तुम्ही कंपनीच्या वैल्यूएशन ची माहिती मिळवू शकता. पी बी रेश्यो मोजण्यासाठी शेयर प्राइस ला बुक वैल्यू नी भागले जाते.
PB Ratio = Share Price / Book Value of Company.
आर ओ ई रेश्यो
आर ओ ई रेश्यो वापरून तुम्ही कंपनीत सहज गुंतवणूक करू शकता. आर ओ ई रेश्यो मोजण्यासाठी नेट इनकम ला टोटल इक्विटी ने भागले जाते.
ROE Ratio = Net Income / Total Equity.
डेब्ट टू इक्विटी रेश्यो
डेब्ट टू इक्विटी रेश्यो हा एक अतिशय महत्त्वाचा रेश्यो आहे. कारण हा रेश्यो तुम्हाला कंपनी वर किती कर्ज आहे याची माहिती देतो. डेब्ट टू इक्विटी रेश्यो मोजण्यासाठी टोटल डेब्ट ला शेयरहोल्डर इक्विटी ने भगले जाते.
Debt to Equity Ratio = Total Debt / Shareholder Equity.
डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
निष्कर्ष
फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय? त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे, आणि फंडामेंटल एनालिसिस शी सबंधित इतर माहिती देखील तुम्हाला देण्यात आली आहे. मित्रांनो, आम्हाला आशा आहे, कि आम्ही या लेखात फंडामेंटल एनालिसिस बद्दल दिलेली माहिती तुम्हाला आवडेल, तर तुम्ही ह्या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.
FAQ
1. फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय?
आपण फंडामेंटल एनालिसिस मुळे कंपनी चांगली आहे की वाईट यांचे मूल्यांकन करू शकता. चांगली कंपनी काही चांगले रिजल्ट दाखवते आणि वाईट कंपनी काही वाईट रिजल्ट दाखवते.
2. फंडामेंटल एनालिसिस कसे करावे?
फंडामेंटल एनालिसिस करण्यासाठी, कोणत्याही कंपनीचे मैनेजमेंट कसे आहे, कंपनीची फाइनेंसियल कंडीशन काय आहे, शेयर ची सध्याची प्राइस काय आहे, कंपनीची फ्यूचर प्लानिंग काय आहे आणि कंपनीचे बिज़नेस मॉडेल काय आहे, त्याचा अभ्यास केला जातो.
3. फंडामेंटल एनालिसिस किती प्रकारे केले जाते?
क्वालिटेटिव एनालिसिस मध्ये कंपनीच्या मैनेजमेंट चे निर्णय, कंपनीचा परफॉरमेंस, कंपनीचा ब्रांड वैल्यू , कंपनीचे फ्यूचर प्लानिंग आणि इतर चा समावेश होतो. क्वांटिटेटिव एनालिसिस मध्ये कंपनीचे फाइनेंसियल स्टेटमेंट आणि कंपनीची नंबर रिपोर्ट ला तपासले जातात.