Site icon stockmarketlearnmarathi

टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय?

आज या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून आपण टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय? याबद्दल समजून घेणार आहोत. तुम्हाला शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस चे ज्ञान असायला हवे. त्याचप्रमाणे तुम्हाला शेयर मार्किट मध्ये ट्रेड करायचा असेल, तर तुम्हाला टेक्निकल एनालिसिस चे ज्ञान असायला हवे. हे एनालिसिस चार्ट, इंडिकेटर आणि प्राइस एक्शन आधारावर असते.

टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय?

स्टॉक मार्किट मध्ये, स्टॉक चे टेक्निकल एनालिसिस हे स्टॉकची प्राइस, वॉल्यूम आणि इतर घटकांचे एनालिसिस करुन स्टॉक च्या भविष्यामध्ये किंमतीचा चढ-उतार चा अंदाज लावण्याचा एक प्रकार आहे. टेक्निकल एनालिसिस मुळे शेयर प्राइस मध्ये होणारी मूवमेंट समजून घेण्यास मदत होते. आपण याचा उपयोग सर्व प्रकारचे ट्रेड घेण्याकरिता किंवा इन्वेस्ट करण्याकरिता, जसे कि, कमोडिटी, करेंसी मार्किट आणि इतर साठी करू शकता. टेक्निकल एनालिसिस मुळे, आपण मागील दिवस, आठवडा, महीना किंवा वर्षात शेयर च्या प्राइस आणि शेयर चा ट्रेंड काय आहे हे शोधू शकता. आणि हे लक्षात ठेवून, तुम्हाला शेयर ची सध्याची प्राइस आणि ट्रेंड ची माहिती मिळते. ज्यामुळे ट्रेडर योग्य निर्णय घेऊन शेयर मार्किट मध्ये ट्रेड करू शकतो. आणि टेक्निकल एनालिसिस सुद्धा चार्ट पैटर्न आणि इंडिकेटर टूल्स नी केल्या जाते.

टेक्निकल एनालिसिस कसे करायचे? 

चार्ट पैटर्न 

चार्ट पैटर्न वापरून टेक्निकल एनालिसिस सोप्या पध्दतीने केले जाते. शेयर मार्किट मधील विविध प्रकारचे चार्ट वापरून टेक्निकल एनालिसिस केले जाते.

इंडिकेटर 

इंडिकेटर वापरून टेक्निकल एनालिसिस सोप्या पध्दतीने केले जाते. शेयर मार्किट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडिकेटर ने टेक्निकल एनालिसिस केले जाते.

टेक्निकल एनालिसिस मध्ये चार्ट चे किती प्रकार आहेत ?

1. लाइन चार्ट 

लाइन चार्ट हा सामान्य साधा चार्ट पैकी एक आहे. चार्ट मधील ही लाइन डावीकडून सुरु होते आणि उजवीकडे संपते. ही लाइन शेयर ची प्राइस दर्शवते. आणि कोणत्याही शेयर किंवा इंडेक्स ची क्लोजिंग प्राइस सुद्धा दाखवते. आणि हा लाइन चार्ट तुम्हाला शेयर ची सामान्य मूवमेंट समजून घेण्यास खुप मदत करतो.

2. बार चार्ट 

बार चार्ट हा एक महत्त्वाचा चार्ट आहे. बार चार्ट मधील एक लांबलचक लाइन बाजारातील लो प्राईस आणि हाई प्राइस ची माहिती देते. आणि डाव्या आणि उजव्या बाजूला दोन लहान लाइन शेयर ची ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस दर्शवतात. प्राइस मधील फरक दाखवण्यासाठी बार चार्ट मध्ये वेगवेगळे रंग वापरले जातात.

3. कैंडलस्टिक चार्ट 

कैंडलस्टिक चार्ट हा स्टॉक मार्किट मध्ये सर्वाधिक वापरला जाणारा चार्ट आहे. या चार्टला कैंडलस्टिक चार्ट म्हणतात, कारण तो मेणबत्ती सारखा दिसतो. यात मेणबत्तीचा आकाराचे शरीर आहे. खाली आणि वर एक लहान रेषा आहे. या रेषेला अप्पर वीक आणि लोअर वीक असेही म्हणतात. ह्या कॅण्डल चा अप्पर वीक चा हाई पॉइंट, हाई प्राइस ला इंडीकेट करतो. आणि ह्या कॅण्डल चा लोअर वीक चा लो पॉइंट, लो प्राइस इंडीकेट करतो. ह्या चार्ट मध्ये कैंडल चा बॉडीला लाल आणि हिरव्या रंगाचा उपयोग केला जातो.

टेक्निकल एनालिसिस मध्ये इंडिकेटर किती प्रकारचे आहेत ?

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

निष्कर्ष 

तुम्हाला या लेख मध्ये टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. आणि तुम्हाला टेक्निकल एनालिसिस च्या सबंधित इतर माहिती सुद्धा देण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे, कि तुम्हाला ही माहिती खुप आवडली असेल. आणि तुम्ही ह्या लेख ला लाइक, शेयर, आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.

FAQ 

1. टेक्निकल एनालिसिस कसे केले जाते?

टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी चार्ट पैटर्न आणि इंडिकेटर चा उपयोग केला जातो.

2. टेक्निकल एनालिसिस मध्ये चार्ट चे किती प्रकार आहेत?

टेक्निकल एनालिसिस मध्ये लाइन चार्ट, बार चार्ट, कैंडलस्टिक चार्ट आणि इतर प्रकारचे चार्ट आहे.

3. टेक्निकल एनालिसिस मध्ये किती प्रकारचे इंडिकेटर आहेत?

टेक्निकल एनालिसिस मध्ये मूविंग एवरेज इंडिकेटर, बोलिंजर बैंड इंडिकेटर, RSI इंडिकेटर, VWAP इंडिकेटर आणि इतर प्रकारचे इंडीकेटर्स असतात.

Exit mobile version