Site icon stockmarketlearnmarathi

केंद्र सरकारने आणले ऑनलाइन गेमिंग बिल २०२५, नझारा टेक कंपनीचा शेअर कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण!

केंद्रीय सरकारने ऑनलाइन गेमिंग बिल २०२५, लोकसभेत मांडताच, गुंतवणूकदारांना खुप मोठा धक्का बसला आहे. नझारा टेक कंपनीचा शेअर दोन दिवसांत तब्बल २२% कोसळल्या मुळे, शेयर बाजारात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आणि तसेच ब्रोकरेज हाउसेसने सुद्धा नझारा टेक कंपनीच रेटिंग कमी केलं असल्यामुळे, सर्व सामान्य गुंतवणूकदारांमध्ये खुप मोठ भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ सादर होताच, गुंतवणूकदारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेमिंग सेक्टरशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स सतत घसरत आहेत, तर नझारा टेकचा शेअर सर्वाधिक कोसळला आहे. केवळ दोन दिवसांत हा गेमिंग स्टॉक जवळपास २२% ने घसरला आहे. एवढंच नाही, तर ब्रोकरेज हाउसेसनी नझारा टेकचे रेटिंग डाऊनग्रेड करून गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढवली आहे.

ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ सादर होताच शेअर्स घसरले

केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ लोकसभेत सादर करताच, नझारा टेकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बुधवारी नझारा टेकचे शेअर्स १२.८८% ने घसरून १३९७ रुपयांवरून थेट १२२० रुपयांवर बंद झाले.

गुरुवारीही ही पडझड थांबली नाही. नझारा शेअर प्राइस ११७८ रुपयांवर उघडल्यानंतर काही वेळातच १०८५ रुपयांवर कोसळला. अवघ्या दोन व्यावसायिक दिवसांत नझारा टेकच्या शेअर्सची किंमत तब्बल २२% ने घसरली आहे.

यासोबतच, नझारा टेकचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर घटून सुमारे १०,२१० कोटी रुपयांवर आले आहे. या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून येत आहे.

ब्रोकरेज हाउसेसने लक्ष्यासह रेटिंग कमी केले

केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ लोकसभेत सादर केल्यानंतर, ब्रोकरेज हाउसेसने नझारा टेकच्या शेअर्सवर नकारात्मक दृष्टिकोन घेतला आहे. याच अनुषंगाने, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने नझारा टेकच्या लक्ष्य किंमतीत तब्बल २७% कपात करत ती ₹१,५०० वरून थेट ₹१,१०० वर आणली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन गेमिंग बिलाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या भविष्यातील कमाईवर दबाव येऊ शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, नझारा टेकचे रेटिंग देखील ‘अ‍ॅड’ वरून ‘रिड्यूस’ असे बदलण्यात आले आहे, ज्यामुळे ब्रोकरेज कंपनीने गुंतवणूकदारांना या स्टॉकबाबत सावधगिरीचा सल्ला दिला आहे.

ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ चा नझारा टेकवर मोठा परिणाम

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग क्षेत्राचे नियमन करण्यासाठी लोकसभेत सादर केलेले विधेयक मंजूर झाल्यानंतर, देशातील रिअल मनी ऑनलाइन गेमिंगला पूर्णपणे स्थगिती दिली जाईल.

या निर्णयाचा थेट फटका नझारा टेक्नॉलॉजीजला बसण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, नझारा टेक चा मूनशाईन टेक्नॉलॉजीज मध्ये मोठा हिस्सा आहे, जी PokerBaazi सारख्या रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्स चालवते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, मूनशाईन टेक्नॉलॉजीजचे मूल्यांकन पूर्वीच्या ₹400 कोटींवरून थेट शून्यावर (₹0) आणले आहे. यामुळे कंपनीच्या एकूण आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

मोठ्या गुंतवणूकदारांना नझारा टेक शेअर क्रॅशमुळे ३०० कोटींचे नुकसान

नझारा टेक शेअर क्रॅशमुळे फक्त लहान गुंतवणूकदारांनाच नाही, तर मोठ्या इन्व्हेस्टर्सनाही जबरदस्त फटका बसला आहे. दोन दिवसांतच, कंपनीतील प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिस्सेदारीचे एकूण अंदाजे ₹300 कोटींचे नुकसान झाले आहे.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, ३० जून २०२५ पर्यंत नझारा टेकमध्ये प्रमुख गुंतवणूकदारांचा खालीलप्रमाणे हिस्सा होता:

दोन दिवसांतच, शेयर मार्केट मध्ये, शेअर प्राइस मोठ्या प्रमाणावर कोसळल्यामुळे, या तिघांच्या एकूण गुंतवणुकीचे अंदाजे ₹300 कोटी मूल्य गमावले आहे.

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

निष्कर्ष

तुम्हाला या लेख मध्ये, केंद्र सरकारने आणले ऑनलाइन गेमिंग बिल 2025, नझारा टेकचा शेअर कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण, याबद्दल सविस्तर सांगितले आहे. जर तुम्हाला या लेख मध्ये दिलेली माहिती आवडली असेल, तर तुम्ही या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.

Exit mobile version