Site icon stockmarketlearnmarathi

एसआयपी: वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.

एसआयपी: शेयर बाजार सध्या अस्थिर झाला आहे. विदेशी गुंतवणूकदार खुप प्रमाणात भारतीय शेयर बाजरातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत, त्यामुळे  काही  दिवसात गुंतवणूकदारांचे शेयर बाजारात लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत लहान गुंतवणूकदारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यामुळे खुप लहान गुंतवणूकदारांनी आपली एसआयपी (सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान) बंद केल्याची माहिती समोर येत आहेत.

वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा.

शेयर बाजारात सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये खुप मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु आहे. आणि ज्या वेळेस शेयर बाजार मोठ्या प्रमाणात घसरतो, त्या वेळेस लहान गुंतवणूकदार घाबरत असतो. आणि अशा स्थितीत लहान गुंतवणूकदाराकडून काही चुकीचे निर्णय घेण्यास सुरुवात होते. म्हणजेच आपले एसआयपी (सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान) बंद करने किंवा निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स मध्ये आपली वार्षिक गुंतवणूक थांबवणे हे करने, सुरक्षित वाटू शकते. परंतु आपल्या आर्थिक परिस्थिती साठी खुप धोकादायक आहे.

एसआयपी का नाही थांबवायची?

एसआयपी (सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान) हे शेयर बाजारातील चढ-उतार च्या वेळी गुंतवणूकदारांचा फायद्यासाठी बनवलेले आहे. जेव्हा आपण शेयर बाजारात खालच्या पातळीवर एसआयपी ची खरेदी सुरु ठेवतो तेव्हा आपल्याला आपल्या सरासरी मासिक गुंतवणूक रकमेपेक्षा जास्त यूनिट्स मिळतात. कारण त्या वेळेस एनएव्ही (नेट एसेट वैल्यू) कमी असतात. आणि जेव्हा शेयर बाजारात वाढ व्हायला सुरुवात होते, तेव्हा या खरेदी केलेल्या जास्त यूनिट्स वर आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

एसआयपी सुरु ठेवणे का महत्त्वाचे आहे?

शेयर बाजार मध्ये काही मागील वर्षामध्ये असे दिसून आले आहे की, मागील वीस वर्षामध्ये अशा खुप वेळा झाले आहे, जेव्हा नेशनल स्टॉक एक्सचेंज चा निफ्टी 50 इंडेक्स मध्ये दहा टक्के पेक्षा जास्त घसरण झाली होती. आणि त्यानंतर निफ्टी 50 इंडेक्स नी तेवढ्याच वेळा एका वर्षामध्ये दहा टक्के चा वर परतावा दिला आहे. आणि महत्वाचे म्हणजेच पाच वेळा निफ्टी 50 इंडेक्स नी वीस टक्के पेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा शेयर बाजार दहा टक्के पेक्षा जास्त घसरला आणि आपण जर एसआयपी (सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान) ची गुंतवणूक सुरु ठेवली असती, तर आपल्याला खुप जास्त प्रमाणात परतावा मिळाला असता.

शेयर बाजार मध्ये मागील काही वर्षाचा कार्यकाळ?

वारेन बफे काय म्हणतात?

शेयर बाजारातील मागील काही वर्षाचा डेटा आपण पाहिला आहे. या डेटा आपल्याला शेयर मार्किट मधील सर्वात मोठे गुंतवणूकदार वारेन बफे च्या प्रसिद्ध मन ची आठवण करुन देत आहे. ज्यामध्ये वारेन बफे असे म्हणतात की, ज्या वेळेस शेयर मार्किट मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास घाबरत असतात, त्या वेळेस आपण शेयर मार्किट मध्ये गुंतवणूक करायची आणि जेव्हा शेयर मार्किट आपल्या उच्चतम स्तरावर असते, तेव्हा आपल्याला गुंतवणूक करण्यास थांबायच असतात.

एसआयपी बंद केल्यामुळे काय नुकसान होईल?

शेयर बाजार मध्ये एसआयपी बंद केल्यामुळे, गुंतवणूकदाराला कमी किंमत मध्ये मिळणारे शेयर, खरेदी करण्याची वेळ निघून जाते. आणि ज्या वेळेस शेयर मार्किट खालच्या पातळीवर असते, त्यावेळेस मार्किट मधून बाहेर पडल्याने, आपल्या नुकसान मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे जेव्हा शेयर मार्किट मध्ये वाढ होते, तेव्हा गुंतवणूकदार नफा कमावू शकत नाही.

शेयर बाजारात चढ-उतार सुरु असतांना काय करावे?

शेयर बाजारत चढ-उतार सुरु असला तरी, आपण जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर त्यामुळे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओचे पुनर्मूल्यांकन करण्याची उत्तम संधी आहे. आपली सध्याची गुंतवणूक आपण घेत असलेल्या जोखमीच्या क्षमतेनुसार आहे कि नाही यांचे मूल्यमापन करण्यासाठी ह्या संधीचा वापर करु शकतो. शेयर मार्किट मध्ये, जेव्हा बाजार उच्चतम स्थरावर असतो, तेव्हा आपण इतर गुंतवणूकदारांना खरेदी करत पाहतो आणि आपण शेयर बाजारात गुंतवणूक करतो. परंतु त्या गुंतवणूकदारांची शेयर बाजार मध्ये जोखिम घेण्याची क्षमता आणि वेळमर्यादा वेगळी असू शकते. मार्किट मध्ये आपले ध्येय, जोखिम आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आपला पोर्टपोलिओ योग्यरित्या तयार करायचा आहे. आणि शेयर बाजारात चढ-उतार सुरु असतांना आपल्याला त्या कडे भविष्यातील एक उत्तम संधी म्हणून पहायचे आहे.

डिस्क्लेमर: या लेख मध्ये लिहलेली माहिती फक्त एज्युकेशन चा उद्देशासाठी आहे. जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर, स्वत: शेयर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यावी किंवा फाइनेंसियल एडवाइजर व सर्टिफाइड एक्सपर्ट कडून सल्ला घ्यावा. शेयर बाजार जोखिमीचा अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

निष्कर्ष

तुम्हाला या लेख मध्ये वॉरन बफे असे का म्हणतात, जेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास घाबरतात, तेव्हा तुम्ही गुंतवणूक करा, याबद्दल सविस्तर सांगितले आहे. जर तुम्हाला या लेख मध्ये दिलेली माहिती आवडली असेल, तर तुम्ही या लेख ला लाइक, शेयर आणि कमेंट कराल.

हे पण वाचा: निफ्टी 50 चा इंडेक्स मध्ये जिओ फाइनेंसियल आणि जोमैटो कंपनीचा प्रवेश होणार आहे, आणि या दोन कंपनी बाहेर होणार आहे.

 

Exit mobile version